Home अकोले अकोले शहरात पैशाच्या देवाण घेवाणीच्या वादातून दोन देशमुखामध्येच तुबळ हाणामारी

अकोले शहरात पैशाच्या देवाण घेवाणीच्या वादातून दोन देशमुखामध्येच तुबळ हाणामारी

Akole Crime:  एका देशमुखाने दुसऱ्या देशमुखाच्या डोक्यात पाण्याचा स्टीलचा जग मारल्याने दुसरे देशमुख रक्तबंबाळ झाले अन त्याच्या डोक्याला दोन टाके पडले.

Akole Crime Due to the dispute of exchange of money, two Deshmukhs fight

अकोले: प्रशांत देशमुख यानी नरेंद्र देशमुख यांच्या डोक्यात पाण्याचा जग मारल्याने ते जखमी झाले अशा ही परिस्थितीत त्यांनी प्रशांत देशमुख यांना जमिनीवर यथेच्छ लोळवले. मात्र डोक्यातून अति रक्तस्राव होत असल्याने त्यांनी अकोले ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपचार घेतला. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे

डोक्यात स्टीलच्या जगाचा जोरदार प्रहार झाल्यामुळे नरेंद्र देशमुख याच्या दोन पायांचा रक्तदाबल्याने त्यांना पुढील उपासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले

शहरात पैशाच्या देवाण घेवाणीच्या वादातून दोन देशमुखामध्येच तुबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे यातील एका देशमुखाने दुसऱ्या देशमुखाच्या डोक्यात पाण्याचा स्टीलचा जग मारल्याने दुसरे देशमुख रक्तबंबाळ झाले अन त्याच्या डोक्याला दोन टाके पडले. ही सर्व पटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

अकोले शहरातील अगस्ती विद्यालयासमोर असलेल्या टिस दिपज्योती जवळ ही घटना घडली होटल दिपज्योतीमध्ये प्रशांत संपतराव देशमुख हे चहा पिण्यासाठी जात होते. त्यावेळी नरेंद्र मधुकर देशमुख हा त्याठिकाणी कासावेळी सुरुवातीला दोघांमध्ये शांततेत चर्चा झाली. मात्र नंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची वाढत जाऊन रूपांतर भेट हाणामारीत झाले.

रात्री उशिरा नरेंद्र देशमुख यांच्या फिर्यादीवरून प्रशांत संपतराव देशमुख (रा. सुगाव बुद्रुक, ता. अकोले) याच्यावर भारतीय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर प्रशांत देशमुख यांनीही अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्याच्या फिर्यादीवरून नरेंद्र मधुकर देशमुख (रा. रुभौडी, ता. अकोले) यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अकोले पोलिसानी घटनास्थळी येऊन गुन्हयात वापरलेला स्टीलचा जग पंचनामा करून ताब्यात घेतला आहे. या घटनेचा तपास अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिथुन पुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश आहेर हे करीत आहेत.

Web Title: Akole Crime Due to the dispute of exchange of money, two Deshmukhs fight

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here