Home अहमदनगर अहमदनगर: दोन विवाहितांची आत्महत्या- Suicide

अहमदनगर: दोन विवाहितांची आत्महत्या- Suicide

Ahmednagar Suicide Case:  हुंड्याच्या कारणावरून वेळोवेळी पैशांची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ.

Suicide of two married couples

राहुरी : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पूजा धनवटे या १९ वर्षीय विवाहित तरुणीने दि. १४ रोजी विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले.

हुंड्याच्या कारणावरून वेळोवेळी पैशांची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. विवाहितेचे वडील बाबासाहेब तुळशीराम विटकर (वय ४५, रा. जेऊर, ता. नेवासा) यांच्या फिर्यादीवरून नवरा सूरज धनवटे, सासू सुमन रायभाय धनवटे, भाया महेश

रायभान धनवटे (सर्व रा. वांबोरी, ता. राहुरी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत, सासरच्या त्रासाला कंटाळून तांभेरे येथे दि. १४ रोजी २६ वर्षीय विवाहित तरुणीने साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेचा भाऊ मनोज सीताराम थोरवे (वय ३३ वर्षे, रा. भगवती कोल्हार, ता. राहाता) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी बहीण शीतल प्रतीक मुसमाडे ही तांभेरे येथे सासरी राहावयास होती.

Web Title: Suicide of two married couples

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here