Home संगमनेर संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर कार उलटल्याने भीषण अपघात, एक ठार, आठ जखमी

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर कार उलटल्याने भीषण अपघात, एक ठार, आठ जखमी

Ahmednagar Sangamner Accident:  डोळासणे गावच्या शिवारातील बांबळेवाडी परिसरात महामार्ग ओलांडणाऱ्या  शाळकरी मुलीला वाचवताना भरधाव कारवरील चालकाने अचानक कारचा ब्रेक दाबल्याने कार उलटली. या भीषण अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला तर मुलीसह आठ जण गंभीर जखमी.

One killed, eight injured in car overturn on Pune Nashik highway Accident

संगमनेर (सतिश फापाळे):  तालुक्यातील पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर डोळासणे गावच्या शिवारातील बांबळेवाडी परिसरात शुक्रवारी दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान महामार्ग ओलांडणाऱ्या  शाळकरी मुलीला वाचवताना  भरधाव कारवरील चालकाने अचानक कारचा ब्रेक दाबल्याने कार उलटली. या भीषण अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला तर मुलीसह आठजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.

नाशिक येथे अस्थी विसर्जन करून डेरे कुटुंब हे कार क्रमांक एम.एच.१४ के.बी. ८७१४ मधून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाने पुण्याच्या दिशेने नारायणगाव येथे घरी परतत होते. या दरम्यान, दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते बांबळेवाडी (डोळासणे) शिवारात आले असता वैष्णवी मेंगाळ ही शाळकरी मुलगी दुभाजकाच्या झाडा झुडपातून अचानक रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर आली. त्यावेळी कार चालक विनायक डेरे यांनी मुलीला वाचविण्यासाठी कारचा अचानक ब्रेक दाबला. कार भरधाव वेगात असल्याने ब्रेक दाबताच कार पाच ते सहा वेळा पलटी होऊन ५०० मीटरवर महामार्गाच्या खाली गेली.यात कारचे टायर फुटले असून मोठे नुकसान झाले आहे. कारमधील विजय डेरे यांचा मृत्यू झाला. वैष्णवी मेंगाळ सह कारमधील वरील आठजण गंभीर जखमी झाले.  

या भीषण अपघातात विजय शंकर डेरे (वय-६२,रा. नारायणगाव, जि.पुणे) असे मृत्यू झालेल्या कारमधील व्यक्तीचे नाव आहे. रोहित विजय डेरे (वय-२३) , उज्वला विजय डेरे (वय-४८) ,मोहित विजय डेरे (वय-३०) ,सविता अनिल शेटे (वय-४८) , शैला दिलीप वारुळे (वय-५८) , विनायक शिवाजी डेरे (वय-५०) (सर्व रा. नारायणगाव , पुणे), शोभा दशरथ वायाळ (वय-५४, रा. नांदूर,नाशिक) यांसह रस्ता ओलांडणारी शाळकरी मुलगी वैष्णवी विश्वास मेंगाळ (वय-१२ , सध्या रा. बाळेश्वर आश्रमशाळा, सारोळे पठार, मूळगाव रा. पाटगाव आळेफाटा पुणे) गंभीर जखमी झाले आहेत.

सदर अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस हवालदार अरविंद गिरी,पोलीस नाईक नंदकुमार बर्डे, भरत गांजवे,योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केले. यावेळी वाहतूक सुरळीत केली.

Web Title: One killed, eight injured in car overturn on Pune Nashik highway Accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here