Home अकोले अकोले तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सर्वोदय विद्यालय राजूरचे घवघवीत यश

अकोले तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सर्वोदय विद्यालय राजूरचे घवघवीत यश

Akole Taluka Wrestling Competition: गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन.

Akole Taluka Wrestling competition SVM Student 

अकोले: ॲड. एम एन देशमुख महाविद्यालय राजुर या ठिकाणी दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

ॲड. एम एन देशमुख महाविद्यालय राजुर या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धेत 14 वर्ष, सतरा वर्ष व 19 वर्षे वयोगटातील एकूण 52 कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला .

या स्पर्धेचे उद्घाटन सत्यनिकेतन संस्थेचे संचालक मा. मिलिंद उमराणी यांनी केले, संचालक राम पन्हाळे यांनी व अकोले तालुका क्रीडा प्रमुख श्री अनिल चासकर यांनी शुभेच्छापर मनोवत व्यक्त केले .श्री विकास नवले, किशोर देशमुख, प्राचार्य बी. वाय. देशमुख, प्राचार्य लेंडे एम.डी, उपप्राचार्य बी.एन. ताजणे, जाधव सर ,योगेश उगले , श्रदेशमुख सर, उदमले सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सदर स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे: 

14 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक जिल्हास्तरावर निवड

 1.निलेश लोहारे –  सर्वोदय राजुर – 35 किलो

 2.गुरव समाधान –  सर्वोदय राजुर  – 38 किलो

3.पाटील सुहास –  सर्वोदय राजुर  – 44 किलो  

4.चौगुले संस्कार – सर्वोदय राजुर  – 68 किलो

14 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

1.भांगरे राणी – समर्थ मवेशी – 36 किलो

2.सदगीर अंकिता –  समर्थ मवेशि – 39 किलो

  1. देशमुख विशाखा जय भवानी केळुंगण – 42 किलो

4.लांगी प्रज्वल  – जय भवानी केलुंगण – 46 किलो

17 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

1.पाटील रोहन – सर्वोदय राजुर  – 45 किलो

2.कांबळे आदर्श – सर्वोदय राजुर  – 48 किलो

3.खाडगीर समीर – पिचड विद्यालय – 51 किलो

4.सहाने सार्थक –  नेताजी बोस डोंगरगाव –  55 किलो

5.बोबडे मयूर – मॉडर्न अकोले – 60 किलो

6.पुंडे प्रणव – वीरगाव अकोले – 65 किलो

17 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

1.भांगरे प्रीती – समर्थ मवेशी – 40 किलो

2.वर्षा बोटे – अभिनव अकोले  – 43 किलो

3.संजना वसावे –  एकलव्य मवेशी – 46 किलो

4.पिंकी पावरा –  एकलव्य मवेशी – 49 किलो

5.दीक्षा सोनवणे – एम एन देशमुख राजुर – 53 किलो

19 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय निवड

1.पटेकर दीपक –  सर्वोदय राजुर – 57 किलो

2.मुर्तडकर लोकेश –  सर्वोदय राजुर – 65 किलो

3.सुकटे जयेश – सर्वोदय राजुर – 70 किलो

4.चौधरी प्रसाद – अकोले कॉलेज – 74 किलो

5.लोटे तेजस – सर्वोदय राजुर – 79 किलो

19 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय निवड

1.ठाकरे अंजली –  एकलव्य मवेशी – 50 किलो

2.एखंडे अदिती –  अकोले कॉलेज – 53 किलो

  1. लहामगे चित्रा – सर्वोदय राजुर – 55 किलो

4.महाले प्रीती – सर्वोदय राजुर – 59 किलो

5.खरात चित्रा – अगस्ती अकोले – 62 किलो.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी व्ही.टी. तारु ,जे.आर. आरोटे, भाऊसाहेब बनकर यांनी परिश्रम घेतले व पंच म्हणून साई कुस्ती सेंटरचे कोच श्री नरके सर व शुभम लांडगे यांनी काम पाहिले.

या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष मनोहर देशमुख,  सचिव टी. एन. कानवडे,  संचालक मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन व व्यवस्थापक प्रकाश महाले सर्व संचालक मंडळ, तसेच विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य बी.एन.ताजणे, पर्यवेक्षक एम.बी. मोखरे यांनी अभिनंदन केले.

Web Title: Akole Taluka Wrestling competition SVM Student

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here