Home अहमदनगर गाडीखाली बॉम्ब लावून जीवे मारणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या संशियीत आरोपीस शिर्डीतून अटक

गाडीखाली बॉम्ब लावून जीवे मारणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या संशियीत आरोपीस शिर्डीतून अटक

Shirdi:  गाडीखाली बॉम्ब लावून जीवे मारणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या संशियीत आरोपीस शिर्डीतून अटक (Arrested),  पंजाब एटीएस आणी महाराष्ट्र एटीएस विरोधी पथकाने एकत्र कारवाई.

Suspected accused of trying to kill by planting bomb under car arrested 

शिर्डी: पंजाबमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीखाली बॉम्ब उडविण्याचा कट आखून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशियीत आरोपीस शिर्डी येथील हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे.  

महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथकाने एकत्र कारवाई करत या संशयीत आरोपीस अटक केली आहे. राजेंदर या दहशतवाद्यास शिर्डी येथून अटक केली आहे.

१६ ऑगस्ट रोजी पंजाब मधील पोलीस उपनिरीक्षकाच्या गाडीला IED लावून उडवण्याचा कट आखला होता. यावर पंजाब एटीएस आणी महाराष्ट्र एटीएस विरोधी पथकाने एकत्र कारवाई करत राजेंदर शिर्डी येथील हाँटेल गंगा येथून शुक्रवार दि.१९ रोजी रात्री अटक केली आहे. आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Suspected accused of trying to kill by planting bomb under car arrested 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here