Home Accident News संगमनेर: विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

संगमनेर: विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Sangamner Accident:  विजेच्या धक्का (electric shock) बसल्याने एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू (Death).

Youth dies due to electric shock

संगमनेर: विजेचे उपकरण जोडत असतांना विजेच्या धक्का बसल्याने एका २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील वडगावपान येथे काल शुक्रवारी सकाळी घडली.

परशुराम शामराव थोरात असे या मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी परशुराम थोरात हा घरात विजेचे उपकरण जोडत असतांना अचानक त्याला विजेचा तीव्र स्वरूपाचा धक्का बसला. त्याला तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला. या बाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Youth dies due to electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here