Home क्राईम Crime: संगमनेर शहरात दोन गटात चाकू तलवारीने हाणामारी

Crime: संगमनेर शहरात दोन गटात चाकू तलवारीने हाणामारी

Sangamner Crime:  आशापीर बाबा उरुसामध्ये झालेल्या किरकोळ वादातून दोन गटात भीषण हाणामारी, दोन्ही गटातील दोघे जण जखमी.

Two groups clashed with knives and swords in Sangamner Crime

संगमनेर:  आशापीर बाबा उरुसामध्ये झालेल्या किरकोळ वादातून दोन गटात भीषण हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यात चाकू-तलवारीचा वापर झाल्याने दोन्ही गटातील दोघे जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अलका नगर परिसरात ही घटना घडली.

याबाबत फरदीन अनीस शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यात म्हटले आहे की,  गुरुवार दि. १८ रोजी आशापीर बाबा उरुसामध्ये फरहान शेख, अमन शेख (रा. जमजम कॉलनी) यांच्यासोबत किरकोळ वाद झाला होता. दरम्यान फिर्यादी अलकानगर येथून जात असताना त्याची मोटारसायकल बंद पडली यावेळी आरोपी फरहान शेख व अमन शेख यांनी मागील भांडणावरुन फिर्यादीच्या डाव्या पायाच्या पोटरीवर तलवारीने वार केला. तसेच एकाने हॉकीस्टीकने पायावर व खांद्यावर प्रहार केले. यात फिर्यादी जखमी झाले आहेत.

तर दुसऱ्या फिर्यादीत अमन इम्रान शेख (रा. अलकानगर ) यांनी म्हटले आहे की, मागील भांडणावरुन आरोपी अल्तमश शेख, जुनेद शेख यांनी शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली. तर आरोपी फरदीन अन्सार शेख याने चाकून हाताच्या पंजावर वार केले. तर चौथा आरोपी आयाम सादीक शेख (सर्व रा. जमजम कॉलनी) यांनी तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत फिर्यादीचे पोटात डाव्या बाजूला मारुन गंभीर जखमी करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोन्ही गटातील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

Web Title: Two groups clashed with knives and swords in Sangamner Crime

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here