लग्नास नकार दिल्याने तरुणीने तरुणाच्या घरी जाऊन केला धिंगाणा
Ahmednagar Crime: आई वडिलांना मारहाण व शिवीगाळ करीत आत्महत्या करण्याची धमकी.
अहमदनगर: माझ्याशी लग्न न करू दिल्यास तरुणीने तरुणाच्या घरी जाऊन आई वडिलांना मारहाण व शिवीगाळ करीत आत्महत्या करण्याची धमकी दिली. इस्टाग्राम या सोशल मीडियावर झाली होती ओळख.
मुलीच्या या वर्तवणूकीमुळे मुलाच्या घरच्यानी तिला पकडून पोलिसाच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी त्या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुणाल श्रेणिक शाह (वय २५, रा. स्वीट कॉर्नरसमोर, आगरकरमळा) यानी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे सराफ व्यावसायिक आहेत. इस्टाग्राम या सोशल मीडियावर सुमारे आठ महिन्यांपूर्वी त्यांची आलमगीर (भिंगार) येथील एका तरुणीशी ओळख झाली. या ओळखीतून त्यांनी मुलीला प्रेमदान चौकातील एका कॅफेमध्ये भेटण्यास बोलावले. त्यावेळेस त्या मुलीने लग्न करण्याची मागणी घातली.
कुणाल यांनी लग्न करण्यास नकार दिल्यावर तरुणीने भिंगार पोलीस ठाणे आणि न्यायालयात अत्याचाराची तक्रार दाखल केली. या प्रकरणामध्ये कुणाल यांचा जबाब नोंदविण्यात आलेला आहे. परंतु, त्यांनी तरुणीशी गैरवर्तन केलेले नसल्यामुळे ते बिनधास्त होते.
संबंधित तरुणी गुरूवारी दुपारी दोन वाजता कुणाल यांच्या घरी आली. तिने हातामध्ये ब्लेड आणले होते. माझे कुणाल बरोबर लग्न लावून द्या, नाहीतर मी जीवाचे बरे वाईट करून घेईल, अशी धमकी तिने दिली. कुणाल यांच्या आईने तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तिने मारहाण केली तसेच वडिलांनाही शिवीगाळ केली. लग्न लावून न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: After refusing the marriage, the girl went to the young man’s house