Home क्राईम संगमनेर: ठार करून मृतदेह प्रवरा नदीच्या फेकून देणाऱ्या आठ जणांवर खुनाचा गुन्हा...

संगमनेर: ठार करून मृतदेह प्रवरा नदीच्या फेकून देणाऱ्या आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल

Sangamner Murder Crime: दगडाने ठेचून ठार करत मृतदेह प्रवरा नदीच्या फेकून दिला होता. या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल.

a case of murder has been registered against eight persons who killed and threw the dead body

संगमनेर: तालुक्यातील येठेवाडी येथील बाळू शिरोळे दगडाने ठेचून ठार करत मृतदेह प्रवरा नदीच्या फेकून दिला होता. या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दोघे फरार होते. मात्र, शिरोळेचा मृतदेह सापडत नसल्याने अडचणी वाढल्या. अखेर मृतदेह दाढ खुर्द शिवारात प्रवरा नदीत सापडला.

ओळख पटल्याने आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक असलेल्या ६ जणांना न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिरोळे याने एका महिलेला पळवून नेले होते. याचा राग धरत सागर शिवाजी वाडगे, शिवाजी गेनुराम वाडगे, दत्ता वाडगे, अण्णा वाडगे (येठेवाडी), संपत मारुती डोळझाके (साकूर), मनोज एकनाथ चव्हाण (पेमगिरी), शुभम सुनील खताळ (धांदरफळ), दिनेश बाळू जेधे (घुलेवाडी, ता. संगमनेर) या ८ जणांनी त्याचा खून करून मृतदेह प्रवरेत टाकला होता. ८ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: a case of murder has been registered against eight persons who killed and threw the dead body

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here