Home अकोले अकोलेतील घटना:  चोरांनी दानपेटी, दारू आणि गावही लुटलं!  तीन लाखांचा ऐवज लंपास

अकोलेतील घटना:  चोरांनी दानपेटी, दारू आणि गावही लुटलं!  तीन लाखांचा ऐवज लंपास

Kotul News: तीन लाखांचा ऐवज लंपास (Theft), उसाच्या शेतात दारूवर ताव.

Kotul theft also looted donation box, liquor, and village

कोतूळ: कोतूळ गावात गुरुवारी रात्री कोतुळेश्वर मंदिराची दानपेटी, परमीट रूमची महागडी दारू, दोन दुचाकी आणि काही वाहनांचे पेट्रोल चोरून अडीच लाखांना गावच लुटल्याची घटना घडली आहे.

कोतूळ येथे गुरुवारी चोरट्यांनी कोतुळेश्वर देवस्थानच्या दानपेटीवर डल्ला मारत पाच ते सात हजार रुपये चोरले तर हॉटेल एन्जॉय येथील टीव्ही, प्रोजेक्टर, सीसीटीव्ही, डीव्हीआर, असा पन्नास हजार रुपयांच्या वस्तू तर महागड्या ब्लॅक व्हाईट, ब्लॅक डॉग, व इतर ब्रँडच्या दारू असा पन्नास हजारांचा माल लंपास केला. यावेळी हॉटेलसमोरील उसाच्या शेतात दारूवर ताव मारला. याच परिसरातील भास्कर विश्वनाथ देशमुख यांची दुचाकी चोरली तर सुभाष शांताराम देशमुख यांच्या दुचाकीचे पेट्रोल चोरले. हॉटेल सात बारामधन खाण्याचे पदार्थ व काही रक्कम नेली तर सुनील साबळे यांची पन्नास हजार किमतीची दुचाकी चोरून नेली.

कोतुळेश्वर देवस्थान ट्रस्टचे राजेंद्र देशमुख, सीताराम देशमुख, प्रल्हाद देशमुख, रवींद्र आरोटे यांचे उपस्थितीत सहायक पोलीस निरीक्षक हरिदास लांडे, विजय खुळे, भाऊसाहेब गोराने यांनी पंचनामा केला. आता या चोरीचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Web Title: Kotul theft also looted donation box, liquor, and village

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here