Home अकोले राजूर: गुरुवर्य पाटणकर सर्वोदय विद्यालयास सरपंच हेमलताताई पिचड यांच्या हस्ते ५ संगणक...

राजूर: गुरुवर्य पाटणकर सर्वोदय विद्यालयास सरपंच हेमलताताई पिचड यांच्या हस्ते ५ संगणक भेट

राजूर: गुरुवर्य पाटणकर सर्वोदय विद्यालयास सरपंच हेमलताताई पिचड यांच्या हस्ते ५ संगणक भेट

राजूर: अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयास पाच संगणक संच भेट देण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संगणकीय क्षेत्रात प्राविण्य मिळविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राजूर येथील सरपंच हेमलता ताई पिचड यांनी केले.

  याप्रसंगी संस्थेचे सचिव टी. एन. कानवडे, सह सचिव मिलिंद उमराणी, सहायक प्रकल्प अधिकारी ए.पी. अहिरे, उपसरपंच गोकुळ कनकाटे, माधव गभाले, आमदार पिचड यांचे स्वीय सहायक सचिन वैद्य, बाळासाहेब चोथवे, विजय भांगरे, संचालक विजय पवार, संचालक विलास पाबळकर, पत्रकार घाटकर, विलास तुपे, प्रकाश महाले, अजित गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. शरद तुपविहीरे यांनी केले. आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. शिवाजी नरसाळे यांनी मानले.

Website Title: SVM Rajur 5 computers visit by Sarpanch Hemlatatai Pichad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here