Home अकोले अकोले: राजूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

अकोले: राजूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

अकोले: राजूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

राजूर: राजूर गाव बनत चाललय गुन्हेगारीचे माहेरघर, राजूर नगरीत गेल्या दीड दोन महिन्यांपासून चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले असून राजूर पोलिसांत यांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. आहे.

राजूर गावामध्ये दिवसेंदिवस चोरी व रोडरोमियोगिरीचे प्रमाण मोठ्या स्वरूपात वाढत चालले आहे. या चोरीमध्ये जवळ जवळ पाच ते सहा लाखांची चोरी झाल्याचे सूत्रांनुसार समजते. यामध्ये दुचाकींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. पेट्रोल चोरी, कारचे लोगो, गाड्यांच्या बॅटर्याची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे.

काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीला गेल्या होत्या त्यातल्या काही दुचाकींचा तपास लागला होता. पण चोरी झालेल्या दुचाकी सापडतात मात्र चोर कोण ते सापडत नाही. अहमदनगर येथून आलेल्या डॉग स्कॉड टीमने येऊन सुद्धा तपास केलेला होता तरी या चोरीचा अद्याप तपास लागलेला नाही.

परिसरामध्ये सध्या गुन्हेगारी घरफोडी, रोड रोमियोंचा उच्हाद वाढलेला असून असे प्रकार आज परिसरामध्ये पहावयास मिळतात. तरी या भुरट्या चोरांची कसून तपास करून राजूर पोलिसांनी लवकरात लवकर चौकशी करावी. या चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा व रात्रीची गस्त वाढवावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.   

Website Title: Akole Thunderbolt in Rajur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here