Home महाराष्ट्र राज ठाकरेंच ते विधान बालिशपणाच: रामदास आठवले

राज ठाकरेंच ते विधान बालिशपणाच: रामदास आठवले

Raj Thakare Speech like child Ramdas Athavale 

राज ठाकरेंच ते विधान बालिशपणाच: रामदास आठवले

मुंबई: जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ला घडवून आणला हे सर्वाना माहित आहे. मात्र मोदिनींच हा हल्ला घडविल्याच सांगण हे अतिशय बालिशपणाच लक्षण आहे. राज ठाकरेसारख्या राष्ट्रवादी भूमिका ठेवणाऱ्या नेत्याचे हे विधान बालिश पणाचे आहे अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. मात्र यावरून कोणीही राजकारण करू नये. राज ठाकरेंनी या हल्ल्यामागे मोदींना जबाबदार धरले आहे.मोदिनीचा हल्ला घडवून आणला असा आरोप राज ठाकरे यांचा बालीशपणाचा आहे. असे रामदास आठवले म्हंटले.

राज ठाकरे यांनी कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलातानी मोदी सरकारवर निशाना साधला होता. त्याचबरोबर अजित डोवाल यांच्याही चौकशीची मागणी केली होती. आज उल्हासनगर नगर येथे पत्रकार परिषदेत आठवलेंनी राज ठाकरेंच्या वक्त्याव्याचा समाचार घेतला.

आठवले म्हणाले कि, निवडणुकांचा फायदा घेण्यासाठी हा एअर स्ट्राईक केला नसून पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी हा स्ट्राईक केला गेला. पण,  अप्रत्यक्षपणे याचा आम्हाला फायदा होणारचं, आता फायदा होणार तर आम्ही काय करणार, राजकारणात तोटा होण्यासाठी थोडंच आहोत,  असेही आठवले म्हणाले. सध्या देशात वातावरण बदलले असल्याने एनडीएला तीनशेच्या अधिक जागा मिळाव्यात,  यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र, अखेर जनता जनार्दन असून त्यांचा कौल आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Website title: Raj Thakare Speech like child Ramdas Athavale