अकोले: गावागावात राहिबाईं निर्मांण होण्याची गरज : महसूलमंत्री चंद्रकांत पाटिल
अकोले: गावागावात राहिबाईं निर्मांण होण्याची गरज : महसूलमंत्री चंद्रकांत पाटिल
बीजमाता राहिबाईं पोपेरे यांच्या गावरान बियाणे बँकेचे व घराचे उद्घाटन
पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी: -महिलांचे आरोग्य, शिक्षण व महिला स्वयंपूर्ण होण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगतानाच पारंपरिक बियाणे संवर्धंनातून देशभर ओळख निर्माण केलेल्या राहिबाई पोपेरे यांचे कार्य सर्वांसाठी पथदर्शी आहे. गावागावात राहिबाईं निर्मांण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत पाटिल यांनी आज येथे केले बीजमाता राहिबाईं पोपेरे यांच्या गावरान बियाणे बँकेच्या व घराच्या उद्घाटनावेळी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.यावेळी पालकमंत्री. प्रा. राम शिंदे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित हाते. सरपंच शांताबाई पोपेरे, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे,जि.प.मा.अध्यक्ष अशोकराव भांगरे,जि.परिषद सदस्य सौ.सुनिताताई भांगरे,डॉ. किरण लहामटे, बाजीराव दराडे,शिवाजीराजे धुमाळ,सिताराम भांगरे,ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत, संदिप भुजबळ, शिवाजी धुमाळ,नितीन जोशी,दिपक वैद्य ,डॉ.रामहरी चौधरी, आदी उपस्थित होते.
महसुलमंत्री श्री. पाटील म्हणाले, दुर्गम भागात पारंपारिक बियांणे संवर्धनाच्या कामामुळे राहिबाईंचे नाव जगभर झाले. स्वत:सोबतच परिसरातील महिलांना बरोबर घेऊन राहिबाईंनी केलेले पारंपारिक बियांणे संवर्धनाचे काम पथदर्शी आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात राहिबाईंनी बोलतांना बीज बँक व घराची अडचण मांडली. राहिबाईंनी मांडलेली अडचण दुर करण्यासाठी त्यांना पर्यांवरणपुरक बियाणे बँक उभी करुन दिली आहे. या बियाणे बँकेच्या माध्यमातुन पारंपारिक बियाणांच्या संवर्धनासोबतच पारंपरिक बियाणांचा प्रचार व प्रसार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिलांचे आरोग्य, शिक्षण व महिलांना स्वयंपुर्ण करण्यासाठी शासन कायम पाठीशी आहे. महिलांनी आर्थिकदृष्या स्वयंपुर्ण होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले.
राज्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने भरीव निधी दिला आहे. राज्य शासनाने साडेचार वर्षांत अनेक सिंचन प्रकल्पाचे कामे केल्याने सिंचनाखालील क्षेत्रात आठ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. शेतकरी केंद्रबिंदु ठेवुन शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगुन श्री. पाटील म्हणाले, कोंभाळणे परिसरात 72 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांची अडचण दुर होणार आहे. मोबाईल टॉवरचीही उभारणी करण्यात येणार असुन त्यामुळे भ्रमणध्वनी सुविधा लवकरच मिळणार आहे. यासोबतच गावातील आवश्यक सोईसुविधांसाठी निधी कमी पडु दिला जाणार नाही असे त्यांनी सांगितले
पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, दुर्गम भागात राहिबाईंनी बियाणे संवर्धनाच्या कामातुन संपुर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळेच केंद्रशासनाकडुनही राहिबाईंच्या कार्यांचा गौरव होणार आहे. राहिबाईंनी दुर्गम भागात सेवाभावी वृत्तीने केलेले काम नक्कीच दिशादर्शक ठरेल. असे सांगुन कोभाळणे व परिसराला जोडणारे रस्ते व आवश्यक सोईंसुविधांसाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल. असे त्यांनी सांगितले.
बीजमाता राहिबाईं पोपेरे म्हणाल्या, वीस वर्षांपासुन पारंपारिक बियाणे संवर्धनाचे काम करत आहे. आज तीन हजार महिलांसोबत काम करते. पारंपरिक बियाणे संवर्धनासाठी आवश्यक बियाणे बँक व घरांची अडचण पुण्यातील एका कार्यक्रमात मांडली. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्या मागणीची तातडीने दखल घेत बियाणे बँक व घरांची उभारणी करुन दिली. याचा मला मोठा आनंद झाला आहे. या बियाणे बँकेच्या मदतीने न पारंपरिक बियाणे जपण्याचे काम वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी बियाणे बँक व घरांची पाहणी केली व अवघ्या 36 दिवसांत बियाणे बँक उभारणीचे उत्कृष्ट काम केल्याबाबत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बायप संस्थेचे कार्यकारी आधिकारी जितीन साठे यांनी केले. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ, महिला,युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बायफ संस्था व कर्तव्य फाऊंडेशन पुणे यांनी परिश्रम घेतले.
Website Title: need to be rescued in the village Chandrakant Dada Patil