Home महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत होणार लक्ष्मीदर्शन दानवे यांनी केला पैशाचा उल्लेख

लोकसभा निवडणुकीत होणार लक्ष्मीदर्शन दानवे यांनी केला पैशाचा उल्लेख

लोकसभा निवडणुकीत होणार लक्ष्मीदर्शन दानवे यांनी केला पैशाचा उल्लेख

जालना: लोकसभा निवडणुकीमध्ये कसे लक्ष्मीदर्शन  होणार आहे, याची चुणूक भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दाखवून दिली आहे. जालन्यामध्ये एका कार्यक्रमात दानवेंनी सांगितले की,  आपण पैसे देतो, विरोधकांकडे पैसे नाहीत त्यामुळे ते आपल्याविरोधात एकत्र आले आहे. दानवे म्हणाले की,  पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले विरोधक एकत्र आलेत तसेच जालन्यामध्ये आपल्याला पाडण्यासाठीही विरोधक एकत्र आलेत.  

आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या’ ओळखपत्र वाटप कार्यक्रमात दानवे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ‘सगळेच लोक म्हणतायत मला जालना लोकसभा मतदार संघातून निवडून द्यायचे, मग निवडणूक घ्यायचीच कशाला  असे म्हणत मला निवडून दिल्याशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकत नाही, असेही दानवे यांनी म्हटले आहे.

अगोदर स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत असलेल्या भाजप शिवसेनेची युती झाली आहे. मात्र कार्यकर्ते अजूनही आपापल्या पक्षाच्याच विजयाच्या घोषणा देत आहे. या कार्यक्रमात उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी फक्त भाजप विजयाच्या घोषणा दिल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी भाजप-शिवसेना युतीचा विजय, असो अशा घोषणा द्या, असे सांगितल्याने उपस्थितांना दिल्याने जोरदार हशा झाला.

Website Title: Ravaosaheb Danve loksabha election Lakshmidarshan

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here