Home अकोले अकोले: पिकअप व छोटा हत्ती  यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार

अकोले: पिकअप व छोटा हत्ती  यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार

अकोले: पिकअप व छोटा हत्ती  यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार

अकोले (प्रतिनिधी)- पिकअप व छोटा हत्ती  यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार तर पाच जण जबर जखमी  झाल्याची घटना काल शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास अकोले -संगमनेर रसत्यावर मनोहरपुर फाट्यानजीक घडली.या अपघातात उषा अरुण बागडे(वय-४०,रा.शाहूनगर,अकोले) यांचा समावेश आहे.
या घटनेची माहिती अशी की- संगमनेर हुन अकोले कडे येत असणारा छोटा हत्ती व अकोलेतून संगमनेर कडे जाणाऱ्या पिकअप मध्ये समोरासमोर जोराची धडक झाली.यानंतर छोटा हत्ती चालकास गंभीर अवस्थेत संगमनेर येथे एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले तर लक्ष्मी चंद्रकांत देवकर (वय-४९),मनिषा चंद्रकांत देवकर( वय-२१),जिजाबाई दगडू हासे (वय-६५) ,बायजाबाई काशिनाथ पवार(वय-६०)  सर्व रा.शाहूनगर, अकोले या महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना  अकोले ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.प्राथमिक उपचारा नंतर त्यांना लोणी येथे हलविण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयांच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच  नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मयत उषा अरुण बागडे हिचे शवविच्छेदन येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.साळुंके यांनी सांगितले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून रात्री घडलेल्या घटनेची पोलीस ठाण्यात  उशिरापपर्यंत कोणतीही नोंद नव्हती.

Website Title: Akole pickups and small truck Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here