Home अकोले अकोले: देवठाण ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरूच

अकोले: देवठाण ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरूच

अकोले: देवठाण ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरूच

अकोले: अकोले तालुक्यातील देवठाण गावच्या सरपंच व ग्रामविकास अधिकार्यांची चौकशी व्हावी व त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी देवठाण ग्रामस्थांनी अकोले तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. आज शुक्रवारी उपोषणाचा त्यांचा दुसरा दिवस आहे.

याबाबत देवठाण ग्रामस्थांनी तहसीलदारांना गावाच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, देवठाण गावातील आढळा नदीवरील विद्युत मोटारी उन्हाळ्यात दिवसातून चार तास चालू ठेवाव्यात, गावच्या सरपंच व ग्रामविकास अधिकऱ्यांची सखोल चौकशी करावी. दशक्रिया विधीसाठी सभा मंडप बांधावा, जनावरांची छावणी सुरु करावी. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत उभारावी, जनावरांचा दवाखाना सुरु करावा,वाड्या वस्त्यांना नळ पाणी पुरवठा चालू करावा या असे इतर मागण्या केलेल्या आहेत. यासाठी कालपासून तहसील कार्यालयासमोर देवठाण ग्रामस्थांचे उपोषण सुरु आहे.  

Website Title: Akole Devthan Fasting in front of Tehsil office of Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here