Home महाराष्ट्र गुप्तधनासाठी चिमुकल्याचे नरबळी देण्याचा प्रयत्न

गुप्तधनासाठी चिमुकल्याचे नरबळी देण्याचा प्रयत्न

गुप्तधनासाठी चिमुकल्याचे नरबळी देण्याचा प्रयत्न

पीरबावडा : गुप्तधनासाठी चिमुकल्याचे बळी देण्याचा प्रयत्न फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथे शुक्रवारी (दि.२४) करण्यात आला. या मुलीचे नशीब बलवत्तर असल्याने अंधश्रघ्दा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते आणि वडोदबाजार पोलिसांनी वेळीच छापा ठाकल्यानें तिचा जीव वाचला.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

      हा प्रकार तीन दिवसांपासुन सुरु होता. मात्र गावात कोणालाही या ‍विषयीची कुणकुणही नव्हती. रांजणगाव येथील बाळु गाणपत शिंदे जालना येथील बाळु गाणपत शिंदे व इमाम पठाण हे पूजा करुन नरबळी देऊन गुप्तधन काढण्याचा तयारीत होते. इमाम पठाण याच्याकडे नरबळीसाठी मुलगी आणण्याची जबाबदीरी सोपविण्यात आली होती. आज बाळु शिंदे आणि दिगंबर जाधव हे पुजेचे साहित्य आणण्यासाठी फुलंब्री येथे जात असतांना अंधश्रध्दा निमुलन समितीचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसलेंसह त्यांचा सहकारी व फुलंब्री पोलिसांनी त्यांना डोंगरगाव येथे अडविले. या दोघांची रांजणगाव येथे घटनास्थळी नेऊन चौकाशी केली असता घरात खोदलेला खडडा, नारळ पुजेसाठी केलेली आकर्षक  मांडणी व देवीची मुर्ती आढळुन आले. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.  घटनास्थळावरुन मुख्य आरोपी बाळु शिंदे, इमाम पठाण यांना व त्यांच्या घरी हा प्रकार केला जात होता तो दिगंबर जाधव यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात वडोद बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here