संगमनेर: भुकंपाच्या हदऱ्याने पठारभागातील अनेक घरांना तडे
संगमनेर: भुकंपाच्या हदऱ्याने पठारभागातील अनेक घरांना तडे
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील घारगाव, बोरबन, आंबीखालसा, खंदरमाळ, अकलापुर माळेगाव पठार, कुरकुंडी, कोठे बुद्रुक आदी गावांना मंगळवार दि.२१ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३२ वाजता २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंपाचा धक्का बसला होता. त्यामुळे तहसिलदार साहेबराव सोनवणे व गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी या ठिकाणी भेट दिली होती. ग्रामस्थांबरोबर चर्चा करुन घाबरुनजाऊ नका. शासन तुमच्या पाठिशी आहे असेही सोगितले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने या गावांमधील मोडकळीस आलेल्या १०० घरांना नोटीस बजावण्यात आल्या असुन भुकंपाच्या धक्कामुळे सतर्क राहण्याचे आदेशाही देण्यात आले आहेत.
शनिवार दि. १८ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास अशाच पध्दतीने भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. पण तेंव्हा धक्क्याची तीव्रता कमी होती. मात्र, मंगळवारी सकाळी घारगाव, बोरबन, अकलापुर, आंबीखालसा, कुरकुंडी, खंदरमाळ, माळेगात पठार कोठे बुद्रुक आदी गावे या भुकंपाच्या धक्क्यांनी जोरदार हादरली आहे. अचानक बसलेल्या हादऱ्यांनी थेट घराबाहेर गावकऱ्यांनी पळ काढला. काहींनी आरडाओरडही केला. पण नेमके काय झाले हे कोणाला समजत नव्हते.
भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती काही ग्रामस्थांनी मोबाइलवरुन तहसिलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांना दिली होती. माहिती समजताच त्यांनी घारगाव या ठिकाणी येऊन ग्रामस्थांना घाबरुन जाऊ नका असे आवाहन करत प्रशासन तुमच्या पाठिशी असल्याचेही सांगितले होते. घारगावाचे ग्रामसेवक अशोक बलसाने यांनी घारगाव येथील ३० तर बोरबन ४० अशा एकुण ७० लोकांना नोटीसा दिल्या आहेत. कोठे ब्रुद्रुक येथील संजय दारुणकर यांनीही परिसरातील २२ लोकाना नोटीस दिल्या आहेत. या नोटीसमध्ये “आपले मोडकळीस आलेले घरे दुरुस्ती करावे किंवा त्या ठिकाणी सपाट जागा करावी. कारण भुकंपामुळे घर पडल्यास जीवितहानी व वित्तहानी होण्याची दाट शक्यता नाकरता येता नाही” असे या नोटसीत नमुद करण्यात आले आहे.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.