Home संगमनेर ब्रेकिंग: संगमनेर तालुक्यात एटीएम फोडले, १६ लाख लंपास

ब्रेकिंग: संगमनेर तालुक्यात एटीएम फोडले, १६ लाख लंपास

Theft ATMs blown up in Sangamner taluka, 16 lakh lamps

संगमनेर | Theft: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील ओवरसीज बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी दरोडा टाकून सुमारे १६ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज शनिवारी रात्री घडली आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तळेगाव येथे इंडियन ओवरसीज बँकेची शाखा आहे. या शाखेजवळ एटीएम आहे. या एटीएम ला रात्रीच्या सुमारास कोणतेही सुरक्षा पुरवलेली नाही. याचाच फायदा घेत शनिवारी पहाटे २:३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएमचे शटर उचकटून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडून फोडून टाकले. चोरट्यांनी गस कटरच्या सहायाने एटीएम मशीन तोडले. यावेळी यामधील सुमारे १६ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास करीत पळून गेले. याबाबत माहिती समजल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल ठाकरे औटी, खेडकर पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चोरट्यांचा शोध घेतला असता कोणताही तपास लागला नाही. या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास तालुका पोलीस करीत आहे.

Web Title: Theft ATMs blown up in Sangamner taluka, 16 lakh lamps

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here