Crime News: संगमनेरात गोवंश जनावरांचे मांस जप्त, दोघांवर गुन्हा
संगमनेर | Crime News: गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांची मांसची वाहतूक करणाऱ्या वाहणाऱ्या शहर पोलिसांनी काल पहाटे पंपिंग स्टेशन रोडवर पकडले. याप्रकरणी दोघाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ६०० किलो गोवंश जनावरांचे मांस व एक कार पोलिसांनी जप्त केली आहे.
रशीद मुनीर सय्यद रा. श्रीरामपूर, मोहम्मद साद खलील शेख रा. भारतनगर संगमनेर अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे त्यांचाकडील कार हिच्यामधून ६०० किलो गोवंश जनावरांचे मांस वाहतूक करत होते. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने वाहन पकडून मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश जगधने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गोरे हे करीत आहे.
Web Title: Crime News Meat of beef confiscated at Sangamner