Home अहमदनगर एकटी घरात झोपलेल्या महिलेस मारहाण करीत अत्याचार

एकटी घरात झोपलेल्या महिलेस मारहाण करीत अत्याचार

Ahmednagar Torture by beating a woman sleeping in a lonely house

अहमदनगर | Ahmednagar: घरात एकटी झोपलेल्या ७४ वर्षीय महिलेस मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी रात्री नगर शहरातील तारकपूर परिसरात घडली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने सदर महिलेस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राजू साहेबराव काते रा. बारस्कर कॉलनी लाल टाकी अहमदनगर यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसानी आरोपीस अटक केली आहे.

७४ वर्षीय पिडीत महिला गुरुवारी रात्री पत्र्याच्या शेडमध्ये एकटी झोपलेली होती. यावेळी आरोपीने एकटी महिलेला पाहून प्रथम तिला मारहाण केली. याप्रकरणी कोणाला काही सांगितल्यास जीवे मारीन अशी धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. तसेच काचेची बाटली तिच्या डोक्यात मारून जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके तोफखाना पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. आरोपीस तत्काळ अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक एस.यु. मोरे अधिक तपास करीत आहे.  

Web Title: Ahmednagar Torture by beating a woman sleeping in a lonely house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here