Home क्राईम संगमनेर: गळ्यातील सोनसाखळी चोरणारी टोळी गजाआड

संगमनेर: गळ्यातील सोनसाखळी चोरणारी टोळी गजाआड

Theft gang that stole the gold chain from the neck is gone

संगमनेर | Sangamner Theft Gang: महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडनाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील वडाला महादेव येथील योगेश सीताराम पाटेकर वय २० आणि नागेश राजेंद्र काळे वय २० या दोघांना संगमनेर पोलिसांनी वडाळा महादेव येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध संगमनेर पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत.

त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

गेल्या काही दिवसांत संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडण्याच्या घटनांमध्ये वाढ वाढ झाली होती. सोनसाखळी चोरीच्या घडलेल्या घटनांचा बारकाईने अभ्यास करून तांत्रिक पुराव्याच्या आधारे पाटेकर आणि काळे यांचा शोध घेतला.

पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख, उप निरीक्षक निवांत जाधव, सहायक फौजदार  राजेश गायकवाड, हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, विजय पवार, सचिन उगले, अण्णासाहेब दातीर,अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर , गणेश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.   

Web Title: Theft gang that stole the gold chain from the neck is gone

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here