Home क्राईम प्रियकराने मुलीचा अश्लील व्हिडीओ शूट: धमकी देत तिच्यावर गँगरेप

प्रियकराने मुलीचा अश्लील व्हिडीओ शूट: धमकी देत तिच्यावर गँगरेप

Boyfriend shoots pornographic video of girl Threats gang rape

पालघर: गेल्या ६ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार  केला जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकर आरोपीने मुलीचा अश्लील व्हिडीओ तयार केला अन हा व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती देऊन  तिघांकडून तिच्यावर वारंवार अत्याचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आल्याचे समोर आले आहे.

 पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील मुरबे येथे ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे  पीडित अल्पवयीन मुलीच्या प्रियकराचा आरोपींमध्ये समावेश आहे. सहा महिन्यांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual abusing) करण्यात येत होते. सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तिघांना अटक करण्यात आली आहे.

प्रियकराने अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ शूट केला अन  हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत  तिघा जणांनी गँगरेप केल्याचं उघडकीस आले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात सामूहिक बलात्कार आणि पॉस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करण्यात आली असून अटक पालघर न्यायालयात हजर केले असता 10 फेब्रुवारीपर्यंत तिघाही आरोपींना पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

Web Title: Boyfriend shoots pornographic video of girl Threats gang rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here