Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: अंगावर भिंत पडून ९ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग: अंगावर भिंत पडून ९ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू

Ahmednagar Accident 9-year-old girl dies after falling on wall

Ahmednagar Accident News | अहमदनगर: बुरूडगाव ता. नगर आझादनगर येथे काल रात्री साडे ९ वाजेच्या सुमारास ९ वर्षीय बालिकेच्या अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघे जण जखमी झाले आहे.

बुरूडगाव ता. नगर आझादनगर येथे तुकाराम मोरे यांचे कुटुंब राहत आहे. या कुटुंबातील तुकाराम मोरे यांचेकडे त्यांची नात मुलीची मुलगी परी आनंद शिंदे वय ९ मूळ गाव भोकर ता. श्रीरामपूर यांच्याकडे आली होती. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ती घराच्या बाहेर खेळत असताना शेजारील भिंत त्यांच्या अंगावर पडली. यावेळी परीचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मी राजू चौघुले, वय ९, सौरभ नवनाथ पवार वय १३, अनिकेत मोरी रा. बुरडगाव हे जखमी झाले आहेत. या  घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Ahmednagar Accident 9-year-old girl dies after falling on wall

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here