Home अहमदनगर विद्यार्थ्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

विद्यार्थ्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

Rahuri Student commits suicide by hanging himself at his residence

Ahmednagar | Rahuri | राहुरी: राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात राहत असणाऱ्या १७  वर्षीय विद्यार्थ्यांने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घडना घडली आहे.   याबाबत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

वांबोरी परिसरात राहणारा विद्यार्थी ओंकार विलास कुसमुडे( वय १७ ) याने आपल्या राहात्या घरात स्लॅबच्या हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेवून आपले जीवन संपविले आहे.  नातेवाईकांनी त्याला वांबोरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते, मात्र तेथील डॉक्टरांनी मयत झाल्याचे  घोषित केले. याबाबत राहुरी पोलिसांना कळविल्याने  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

ओंकार मुसमाडे या विद्यार्थ्याने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली यामागील कारण अद्याप समजू शकले नाही.  याप्रकरणी अधिक तपास पो नि. प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. पारधी हे करीत आहेत.

Web Title: Rahuri Student commits suicide by hanging himself at his residence

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here