अहमदनगर: कंटेनरची मारुती व्हॅनला धडक, व्हॅनने घेतला पेट
अहमदनगर | कोपरगाव | Ahmednagar Accident: नगर मनमाड महामार्गावरील पुणतांबा चौफुलीवर भरधाव कंटेनरने मुंबईकडे जाणाऱ्या मारुती व्हॅनला धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात मारुती व्हॅनलामधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत, मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
हा अपघात एव्हढा भीषण होता की, अपघात होताच व्हॅनने पेट घेतला. व्हॅनमधील सहा जखमींना जवळच असलेल्या हॉटेल आनंदच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजे तोडून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.
पुनतांबा चौफुलीवर कंटेनर नगरहून मनमाडकडे भरधाव वेगाने जात होता. तर मारुती व्हॅन मुंबईकडे जात असताना तिला कंटेनरने धडक दिली. यामध्ये साहेबराव लक्षमण बेंदूरे, रोहिदास लक्षमण दशरथ पानमंद, अनिता राम साळुंके, संगीता साहेबराव बेंदूरे हे जखमी झाले. यातील चार महिला गंभीर जखमी आहेत. हा अपघात घडतांच कंटेनर चालक पळून गेला, या घटनेची माहिती माहिती मिळताच पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले.
Web Title: Kopargaon Accident Container hits Maruti van