Home क्राईम परिचारिकेची लष्करी जवानाकडून फसवणूक, आमिष दाखवत शरीरसंबंध

परिचारिकेची लष्करी जवानाकडून फसवणूक, आमिष दाखवत शरीरसंबंध

Cheating on a nurse by a soldier, sexual intercourse showing lure

डोंबिवली: लग्नाचे आमिष दाखवत एका लष्करी जवानाने तरुणी परिचारिकेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे, याप्रकरणी पिडीत तरुणीने तक्रार दाखल केल्याने जवानाविरुद्ध कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली येथील रुग्णालयात सेवेत असणाऱ्या तरुणी परिचारिकेससोबत ही घटना घडली आहे. लष्करी जवानाने तरुणीशी संपर्क साधत मैत्री निर्माण केली.  

यावेळी आरोपीने आपला परिचय मनीष पाटील असे नाव असून मैत्री प्रस्थापित केली.  पुढील दोन वर्षांच्या काळात लग्नाचे आमिष देत तिच्यासोबत शरीरसंबंध (sexual intercourse ) प्रस्थापित केले.  तो सुटीला मुंबईत आला असता त्याच्या प्रवास, खरेदी व राहण्याचा खर्च पीडितेनेच केला असल्याचे तिने फिर्यादीत म्हंटले आहे. या कालावधीत पिडीत तरुणीला त्याचे आधारकार्ड हाती लागले यामध्ये त्याचे आडनाव पाटील ऐवजी हागे असल्याचे आढळून आले.

या कालावधीत तरुणी गर्भवती राहिल्याने त्याच्याकडे तिने लग्नाचा तगादा लावला होता.मात्र त्याने याबाबत टाळाटाळ केली. आणि मनीष हागे याने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर तिने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Cheating on a nurse by a soldier, sexual intercourse showing lure

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here