Home अहमदनगर दिवसाढवळ्या दुकानातून सव्वा लाख रुपयांची चोरी

दिवसाढवळ्या दुकानातून सव्वा लाख रुपयांची चोरी

heft News of Rs 15 lakh from a day and a half shop

राहता | Theft News: राहाता शहरातील वीरभद्र मंदिर परिसरात दिवसा उघड्या भांड्याच्या दुकानातून सव्वा लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.

सीमा कुंभकर्ण वय २७ रा, राहाता यांनी राहता पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार मी आज २८ जून रोजी माझ्या मालकीच्या राहता वीरभद्र मंदिरासमोर बाजारतळावर साई स्टील नावाचे दुकान आहे. ह्या भांड्याच्या दुकानात गिऱ्हाईक करीत असताना काही अनोळखी व्यक्ती दुपारी २ वाजेच्या सुमारास भांडे खरेदी करण्याच्या बहाणा करत दुकानात आले.

मला भांडे दाखविण्यात गुंतवून ठेऊन उघड्या गल्ल्याच्या ड्रावर मधील रोख ८४ हजार रुपये व त्यात ठेवलेले दिड तोळ्याचे गंठन किमंत ४५ हजार रुपये असा १ लाख २९ हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेण्यात आला.

या फिर्यादीवरून राहता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Web Title: Theft News of Rs 15 lakh from a day and a half shop

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here