राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना अलर्ट
Whether Alert: राज्यात दडी धरून बसलेला पाउस पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शकयता हवामान खात्याने वर्तविली आहे. रविवारी व सोमवारी या दोन दिवसांत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. २९ आणि ३० जून या दोन दिवसांत राज्यात मुसळधार पाउस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुढील दोन दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात मुसळधार पाउस पडणार असून मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत चांगला पाउस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. पालघर, मुंबई, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा हे जिल्हे वगळता राज्यात सर्व ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो. ९ जुलै नंतर राज्यात सर्वदूर पाउस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Web Title: Whether Alert next two days hevyi rain