Home अहमदनगर दक्षिणेचे राजकारण, कुठे दाढी केली त्याचे फोटो सोशियल मेडीयावर

दक्षिणेचे राजकारण, कुठे दाढी केली त्याचे फोटो सोशियल मेडीयावर

Ahmednagar News Southern politics photos of where he shaved on social media

अहमदनगर | Ahmednagar News: कुठे दाढी केली, कोठे भेट दिली की त्याचे फोटो सोशल मिडीयावर फोटो टाकले जातात. दक्षिण नगर जिल्ह्यात सोशल मिडीयावर कसे राजकारण चालते,  मला माहिती आहे. लोकप्रतिनिधी विकासकामे करण्यासाठी असतो, सोशियल मेडीयावर टाकण्यासाठी नसतो असा खोचक टोला खासदार डॉ. सुजय विखे यांनी नाव न घेता दक्षिणेचे आ. रोहित पवार आणि आ. निलेश लंके यांचे नाव न घेता लगाविला.

नगर महापालिकेतील भाजप- राष्ट्रवादी युतीला अडीच वर्षे पूर्ण झाली. याबाबत गेल्या अडीच वर्षातशहरात कोणती विकासकामे झाली. याचा आढावा डॉ. विखे यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीसमोर मांडला. यावेळी ते बोलत होते.

डॉ. विखे म्हणाले, नगर दक्षिणेत भाजपचा खासदार म्हणून निवडणूक लढविली. नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासावर खासदार म्हणून निवडूण आलो. विकासकामे करण्यावर भर दिला आहे. परंतु, नगर दक्षिणेत विकासकामे कमी आणि सोशल मिडीयावर फोटो सेशन जास्त चालते. याचा अनुभव मला आला आहे. कोणी कुठे दाढी केली, भेटी दिल्या तरी त्याचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट होत असतात.

Web Title: Ahmednagar News Southern politics photos of where he shaved on social media

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here