Home अहमदनगर Murder: पती पत्नीच्या हत्येप्रकरणी दोन मुलांसह दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Murder: पती पत्नीच्या हत्येप्रकरणी दोन मुलांसह दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Rahata connection with the murder of a husband and wife

राहता | Murder: राहता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील चांगले वस्ती येथे दोन दिवसांपूर्वी पती पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार करून निर्घुण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी काल संशियीत म्हणून त्यांच्या दोन मुलांसह अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शनिवारी रात्री शशिकांत श्रीधर चांगले (वय 60) व सिंधुबाई शशिकांत चांगले (वय 55) या दोघां पती पत्नीच्या डोक्यात फावडे मारून खून करण्यात आला. याबाबात राहता पोलीस कसून चौकशी करत आहे.

काल जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधिक्षक संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देवून स्कॉड डॉगच्या माध्यमातून मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कुटुंबातील दोन्ही मुले सुना यांचा जबाब घेण्यात आला. याबाबत संशय बळावल्याने पोलिसांनी मुलासह अन्य दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आज संध्याकाळपर्यंत या हत्येमागचे धागेदोरे हाती लागणार असून या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता तपासी अधिकारी यांनी सांगितले.

Web Title: Rahata connection with the murder of a husband and wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here