Home अहमदनगर चोरट्यांचा धुमाकूळ सोन्याचे दागिने व रोकड लंपास, एकास जबर मारहाण

चोरट्यांचा धुमाकूळ सोन्याचे दागिने व रोकड लंपास, एकास जबर मारहाण

Thieves' gold jewelery and cash theft

जामखेड | Jamkhed: जामखेड तालुक्यातील खर्डा येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकास जबर मारहाण करून सोन्याचे दागिने व रक्कम असा एकूण ६६ हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.

याप्रकरणी खर्डा येथील विकास उर्फ बाळासाहेब दत्तात्रय गोलेकर यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून  दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२२ जानेवारी रोजी पहाटे २ ते २.३० वाजेच्या दरम्यान राहत्या घरात ४ चोरट्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व पत्नीच्या अंगावरील एक तोळा सोन्याचे मंगळसूत्र, सहा ग्रॅम वजनाचे झुंबर, साखळी व कुडके असा ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला.

यावेळी माझ्या खोलीला बाहेरून कडी लावली व वडील दत्तात्रय नामदेव गोलेकर यांना काठीने मारहाण केली. त्यानंतर आरडाओरड केल्याने चोरट्यांनी मुद्देमाल लंपास (Theft) केला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत नामदेव गोलेकर जखमी झाले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच अहमदनगर येथील एलसीबीच्या पथकाने श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले व घटनास्थळी तातडीने भेट देऊन चोरट्यांच्या तपासासाठी पथक रवाना केले. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जामखेड पोलिस करत आहेत.

Web Title: Thieves’ gold jewelery and cash theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here