“आम्ही डिसले गुरुजींच्या सोबत” राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई : डिसले गुरुजीनी एवढं मनावर घेण्याची गरज नसून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांनी अभ्यासासाठी विदेशात जाण्यासाठीचा अर्ज साध्या कागदावर दिला होता. त्यांचा अर्ज विहित फॉरमॅट मध्ये दिलेला नव्हता. आता त्यांनी अर्ज विहित फॉरमॅट मध्ये दिला आहे, त्यामुळे त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
दरम्यान काही अधिकाऱ्यांनी जाणीपूर्वक मुद्दामुन असं केलं आहे का याचा शोध आम्ही घेऊ, तसे दिसल्यास कारवाई करू असंही बच्चू कडू पुढे म्हणाले आहेत. काहींनी आम्ही अधिकारी आहोत तो शिक्षक आहे अशा भावनेतून असं केलं आहे का असं वाटत असल्याची शंकाही कडू यांनी उपस्थित केली. काही जिल्ह्यांमध्ये निश्चितच कोरोनाचे संक्रमण जास्त आहे, त्यामुळे जिथे संक्रमण जास्त आहे अशा ठिकाणच्या शाळा सध्या तरी सुरू करायला नकोत. मात्र तो निर्णय स्थानिक प्रशासनाला घ्यायचा आहे. तसेच शिक्षकांच्या कोरोना चाचणी संदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती देखील बच्चू कडू यांनी दिली आहे.
Web Title : Minister of State Bachchu Kadu supports Disle Guruji