Home अहमदनगर माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव नाहीतर आत्महत्या करण्याची धमकी

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव नाहीतर आत्महत्या करण्याची धमकी

Threaten to commit suicide if you do not have a love affair

अहमदनगर: माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव, पळून चल नाहीतर मी आत्महत्या अशी तरुणीला धमकी दिल्याप्रकरणी तसेच मानसिक त्रास दिल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रकाश रावसाहेब उमाप वय २० रा, नालेगाव नगर असे या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माझ्याबरोबर प्रेमसंबध ठेव अशी मागणी आरोपी प्रकाश उमाप हा अल्पवयीन तरुणीकडे करत होता. पिडीत तरुणीने नकार दिला असता तिच्या घराजवळ येऊन शिट्टी व होर्न वाजवून मानसिक त्रास देत असे. तरुणी या त्रासाला कंटाळून तिच्या काकांच्या घरी गेली असता आरोपी उमाप याने काकांच्या मोबाईलवर फोन करून माझ्यासोबत पळून चल नाहीतर मी आत्महत्या करीन अशी धमकी दिली. तसेच तरुणीच्या घरच्यांना देखील धमकावले. या मानसिक त्रासातून पिडीत तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Threaten to commit suicide if you do not have a love affair

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here