Home क्राईम संगमनेर तालुक्यात चोरी, रोख रकमेसह दागिन्यांची चोरी

संगमनेर तालुक्यात चोरी, रोख रकमेसह दागिन्यांची चोरी

Theft in Sangamner taluka Devkauthe  

संगमनेर |Theft: संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे चांगदेव काहंडाळ यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारत रोख रक्कम व सोन्याच्या दागिनेसह सुमारे ६६,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. सदर घटना ६ जूनच्या मध्यरात्री ते ७ जून सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. यामुळे या परिवाराची मोठी आर्थिक हानी झाली आहे.

यबाबत माहिती अशी की, दिनांक ६ जूनच्या रात्री काहंडळ यांच्या  घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरीचा डल्ला मारला. सकाळी सर्वजण उठल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांच्याकडील ४० हजार रुपये रोख रक्कम व मनी मंगळसूत्र, सोन्याचे झुबे, सोन्याची चैन, सोन्याची अंगठी असा एकूण मिळून ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेले असल्याची माहिती संगमनेर पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस पठाण हे करीत आहे.

Web Title: Theft in Sangamner taluka Devkauthe  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here