Home अहमदनगर रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेविरोधात दोषारोपपत्र

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेविरोधात दोषारोपपत्र

Rekha Jare Murder Case Chargesheet against Bal Bothe

अहमदनगर | Rekha Jare Murder Case:  यशस्विनी महिला ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह सात आरोपीविरोधात अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी मंगळवारी पारनेर न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे.

बाळ बोठे याच्याविरोधात कट रचून खून (Murder) करण्याप्रकरणी व उर्वरित सहा आरोपींविरोधात फरार आरोपींना मदत करणे या कलमानुसार दोष ठेवण्यात आला आहे.

बाळ जगन्नाथ बोठे, राजशेखर अंजय चाकली, जनार्दन अकुला चंद्रप्पा, पी अनंतलक्ष्मी व्यंकट सुब्बचारी, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरिफ सर्व रा. हैद्राबाद व महेश वसंतराव तनपुरे रा. अहमदनगर यांच्याविरोधात ४५० पानांचे दोषारोप पत्र पारनेर न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

बोठे याने ३० नोव्हेंबर २० रोजी नगर पुणे महामार्गावर जातेगाव घाट येथे रेखा जरे यांचा खून घडवून आणला होता. बोठे याचा या प्रकरणात सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर तो फरार झाला होता, त्याला हैद्रबाद येथून अटक करण्यात आली. याकाळात पाच आरोपींनी मदत केली. तर महेश तनपुरे याने नगर येथून मदत केली होती.

Web Title: Rekha Jare Murder Case Chargesheet against Bal Bothe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here