mansoon: राज्यात मान्सूनची जोरदार सलामी, या तारखेला अतिवृष्टीचा इशारा
रत्नागिरी | Mansoon: राज्यात आज मंगळवारी मान्सूनच्या पावसाला जोरदार सुरवात झाली आहे. सोमवारी रात्रीपासूनच फटकेबाजीला सुरवात झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवस अगोदरच मान्सूनचे आगमन झाले आहे. दरवर्षी ७ जूनला पावसास सुरुवात होते. मात्र गेल्या दोन तीन वर्षात अनियमिपणा आला आहे. यंदा पाउस सरासरीपेक्षा अधिक पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
१६ मे रोजी तोक्ते वादळाने अनेक जिल्ह्यात पाऊस पडला आहे. ३१ मे लाच मान्सून केरळात दाखल झाला होता. त्यानंतर १० दिवसांत कोकणात धडकणार असा अंदाज होता मात्र दोन दिवस अगोदरच कोकणात धडाकेबाज सुरुवात झाली आहे. कोकणात १० जून पासून पुढे पाच दिवस अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पावसाची सलामी दिसून येईल.
Web Title: Strong opening of monsoon in the state