Home अकोले अकोले: पत्नीचे प्रेमसंबध, तरुणाच्या आत्महत्याप्रकरणी तिघांना अटक

अकोले: पत्नीचे प्रेमसंबध, तरुणाच्या आत्महत्याप्रकरणी तिघांना अटक

Akole Suicide Case:  पत्नीचे प्रेमसंबध व पत्नी व तिच्या प्रियकाराकडून झालेल्या त्रासामुळे निम्ब्रळ येथील अमोल वाकचौरे या २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या.

Three arrested in connection with wife's love affair, youth's suicide

अकोले: पोलीस पत्नीचे प्रेमसंबध व पत्नी व तिच्या प्रियकाराकडून झालेल्या त्रासामुळे निम्ब्रळ येथील अमोल वाकचौरे या २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी त्याची पत्नी, सासू व मेव्हणा या तिघांना अकोले पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

निंब्रळ येथील अमोल कैलास वाकचौरे याचा गावातीलच पोलिस खात्यात सेवेत असलेल्या तरुणीशी दि. 5 नोव्हेंबर 2018 रोजी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर दोघेही मुंबईला राहत होते. त्यानंतर दोघात वाद होऊ लागल्याने अमोल वाकचौरे दोन वर्षापासून निंब्रळ गावी राहत होता. तसेच त्याच्या पत्नीचे योगेश गोसावी (रा. नांदगाव जि.नाशिक) याचेबरोबर प्रेमसंबंध असल्याचे माहित झाल्याने वाद झाले. पत्नी व तिची आई यांनी दि 23 सप्टेंबर 2021 रोजी मारहाण करुन मुंबई येथून घराबाहेर काढून दिले होते.

पत्नी, सासू व मेव्हुणा यांच्या त्रासामुळे अमोल याने दि 1 नोव्हेंबर 2022 रोजी शेडच्या लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयत अमोलच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी, तिचा प्रियकर योगेश गोसावी तसेच संकेत राधाकिसन सोनवणे, प्रतिभा राधाकिसन सोनवणे यांच्या विरुध्द अमोलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अकोले पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पोलीस आरोपीच्या मागावर होते. या प्रकरणातील सासू, मेव्हणा, पत्नी हे आरोपी संगमनेर न्यायालयात मंगळवारी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी चालले असता त्या आरोपींना मयताचे नातेवाईक आणि पोलिसांनी पकडले.

दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मयताच्या नातेवाईकांनी अकोले पोलीस ठाण्याच्या बाहेर गर्दी करून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न केला. नातेवाईकाच्या जमावाला बाहेर काढून देत चार-पाच जणांशी चर्चा करुन पोलिसांनी वातावरण शांत केले. अकोले पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून लवकरच चौथ्या आरोपीला अटक केली जाईल, असे सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी सांगितले. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Three arrested in connection with wife’s love affair, youth’s suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here