Home संपादकीय Happy Dussehra 2022 Marathi Messages: दसरा व विजयादशमीच्या मराठमोळ्या शुभेच्छा

Happy Dussehra 2022 Marathi Messages: दसरा व विजयादशमीच्या मराठमोळ्या शुभेच्छा

Happy Dussehra 2022 Marathi Messages: भारताच्या विविध प्रांतामध्ये विजयादशमीचा सण साजरा केला जातो. अश्विन शुक्ल दशमी म्हणजे विजयादशमी. साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन, सीम्मोलंघन करण्याची प्रथा आहे.

Happy Dussehra 2022 Marathi Messages

भक्ती व शक्तीचे मिलन दसरा!!! विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

भारतीय संस्कृती ही वीरतेची व शौर्याची पुजक आहे. प्रभु रामचंद्र यांचे वेळेपासून हा दिवस विजय प्रस्थानाचे प्रतिक बनला आहे. प्रभु रामचंद्र यांनी रावणावर मात केली छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाला जेरीस आणणे साठी याच दिवशी प्रस्थान करून हिंदू धर्माचे रक्षण केले होते. हिंदू राजे या दिवशी विजय प्रस्थान करत होते. रघु राजावरही एकदा सिमोलंघन करण्याचा प्रसंग आला होता. रघु राजाकडे वरतंतू यांचा शिष्य कौत्स गुरू दक्षिणा मागणे साठी चौदा कोटी मोहरा मागायला आला होता. रघु राजाने सर्व दक्षिणा दान केली होती. मग त्याने विचार केला की, सोन्याच्या मोहरा मागायला आलेला जर रिकाम्या हाताने परत गेला तर आपल्या सात पिढ्या लज्जित होतील. म्हणून त्याने कुबेराला जो धन संग्रह करून बसलेला असतो, त्याला अल्टिमेटम पाठविले. कुबेर घाबरून गेला. त्याने शमीच्या झाडावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडला.शमी वृक्षाने वैभव दिले म्हणून त्याचे पुजन होऊ लागले. रघु राजाने कौत्साला मोहरा दिल्या. चौदा कोटींपेक्षा अधिक घेणार नाही असे त्याने सांगितले. अधिक असलेली संपती मी घेणार नाही असे रघु राजा म्हणाला. जादा असलेल्या मोहरा लोकांकडून लूटविल्या गेल्या.त्या दिवसा पासून आपट्याची पाने सोने म्हणून देतात. इथे भक्ती आहे शक्ती आहे. नऊ दिवस देवीने युद्ध केले आणि दहाव्या दिवशी दसरा म्हणजेच विजया दशमीला देवीने सिमोलंघन केले. दसरा म्हणजे वीरतेचे पुजन. दसरा म्हणजे हिंदुचा पवित्र सण. भक्ती आणि शक्ती यांचे पवित्र मिलन म्हणजे दसरा होय. भोगावर त्यागाचा विजय म्हणजे दसरा.

तुम्ही देखील तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत साजरा करणार असाल तर दसरा आणि विजया दशमीच्या शुभेच्छा फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून HD Images, Wallpaper च्या माध्यमातून शेअर करू शकतात. दसऱ्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटिंग शेअर करायला विसरू नका. शेअर करून आपला दिवस बनवा खास.

श्रीरामाचा आदर्श घेऊन

रावणरूपी अहंकाराचा नाश करत

साजरा करूया दसरा

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Happy Dussehra 2022 Marathi

उत्सव हा विजयाचा

दिवस सोनं लुटण्याचा

जुने हेवे दावे विसरून सारे

दिवस फक्त आनंद लुटण्याचा

दसरा व विजयादशमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

झेंडूचे तोरण लावा दारी,

सुखाचे किरण येऊ दे घरी,

पूर्ण होऊ द्या तुमच्या सर्वा इच्छा,

विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा

आपट्याची पाने, झेंडूची फुले,

Happy Dussehra 2022

घेऊनी आली आश्विनातली “विजयादशमी”

दसर्‍याच्या आज शुभ दिनी

सुख समृद्धी नांदो तुमच्या जीवनी

शुभ दसरा!!!

निसर्गाचं दान आपट्याचं पान

त्याला सोन्याचा मान

तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती  समाधान

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीरामाचा आदर्श घेऊन

रावणरूपी अहंकाराचा

नाश करत

दसरा साजरा करूया..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव आला विजयाचा,

दिवस सोनं लुटण्याचा,

नवं जुनं विसरून सारे,

फक्त आनंद वाटण्याचा,

तोरणं बांधू दारी,

घालू रांगोळी अंगणी,

करू उधळण सोन्याची,

जपू नाती मना मनांची..

विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Dussehra Marathi Messages

पहाट झाली दिवस उजाडला,

आला आला सण दसऱ्याचा आला,

अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,

उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..

आपणास व आपल्या परिवारास

विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

Happy Dussehra i Messages

दसरा!

या दिवशी म्हणे सोनं वाटतात..

एवढा मी श्रीमंत नाही,

पण नशिबानं जी सोन्यासारखी

माणसं मला मिळाली..

त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..

सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..

सदैव असेच रहा..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..

केवळ सोन्यासारख्या लोकांना..

हॅप्पी दसरा!

Happy Dussehra 2022 Marathi Messages New

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार,

मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,

आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,

तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून

विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!

तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,

भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो..

Happy Dasara..!

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,

सजली दारी तोरणे ही साजिरी,

उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा,

उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,

दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!

तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभ दसरा

दसऱ्याला करतो पाटी पूजन,

आणि वंदितो शस्त्रे, वाहन

निगा राखण्याचे आश्वासन,

बुद्धी, शक्तिचे होते मीलन

मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,

सण दसरा हा उत्कर्षाचा

चैतन्यास संजीवनी लाभोनी

होवो साजरा मनी,

उत्सव तो नवहर्षाचा

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर

आपल्या यशाच्या आड येणाऱ्या

सगळ्या सीमा पार करुन

आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊ या

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

“Lay a garland of marigold flowers today at the door, let the

rays of happiness come to your home,

let it be fulfilled All your wishes,

Happy Vijayadashami to you”

Share With Friends Happy Dussehra 2022 Marathi Messages

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here