Home नंदुरबार खाऊ आणण्यासाठी गेलेल्या तीन चिमुकल्यांचा नदी पात्रात बुडून मृत्यू

खाऊ आणण्यासाठी गेलेल्या तीन चिमुकल्यांचा नदी पात्रात बुडून मृत्यू

Three Chimukals who went to fetch food drowned

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा गावात नदी पात्रात बुडून (drowned) तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे तीनही चिमुकले देवानंद नदी ओलांडून पलीकडे असणाऱ्या हेंगलाचा पाडा इथे दुकानावर खाऊ आणण्यासाठी जात होते. बुधवारी दुपारी ही घटना घडली  या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत रात्री फिर्याद दाखल करण्यात आली आहे.  

निलेश दीलवर पाडवी (वय 4), मेहेर दिलवर पाडवी (वय 5) आणि पार्वती अशोक पाडवी (वय 5) अशी मयतांची नावे आहेत.

धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे वास्‍तव्‍यास असलेले तीन चिमुकले आईने सांगितलेले सामान आणण्यासाठी दुसऱ्या पाड्यावरील किराणा दुकानात जात होते. या दरम्‍यान देवानंद नदी ओलांडताना (drowned) तीन चिमुकल्यांचा मृत्यु झाला. नदीतील पाण्यात खोल खड्यात बुडून तिघांचा मृत्यु झाला.

Web Title: Three Chimukals who went to fetch food drowned in a river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here