Home महाराष्ट्र सावधान: राज्यात कोरोना वाढतोय, आज वाढले इतके रुग्ण – Corona Update

सावधान: राज्यात कोरोना वाढतोय, आज वाढले इतके रुग्ण – Corona Update

Corona is growing in the state, so many patients today Corona Update

मुंबई | Corona Update: राज्यात पुन्हा कोरोना पाय पसरवू लागला आहे. कोरोना रुग्न्संख्यात झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे.  राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आता पुन्हा दर दिवशी चार हजारांच्या पुढे गेली आहे. तर देशातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे.

आज राज्यात 4255 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता पुन्हा वाढली आहे. तसेच मुंबईतील कोरोना रुग्णांची सख्याही झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. मुंबई जवळच्या उनगरातील रुग्णही वाढत आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध नको असतील तर नियमांचं पालन काटेकोरपणे होणं अत्यंत गरजेचं आहे.

रोजची कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत असल्याने राज्यातली सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 20,634 वर पोहचल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात बीए 4 बीए 5 या रुग्णांत वाढ होत असून नागपूर येथे गुरुवारी बीए-5 चे दोन रुग्ण आढळले आहेत.

Web Title: Corona is growing in the state, so many patients today Corona Update

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here