Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात अवकाळी पाउस, वीज कोसळून तीन गायी ठार

अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात अवकाळी पाउस, वीज कोसळून तीन गायी ठार

Three cows killed in lightning strike and rain

पारनेर | Parner: पारनेर तालुक्यातील पश्चिम व उत्तर भागात शुक्रवारी सांयकाळी मेघ गर्जनेसह वकाळी पाऊस (rain) पडला. पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी पळसी येथील लताबाई भोरु वाघ याचा तीन गायी वीज पडल्याने मृत्यूमुखी झाल्या आहेत.

पारनेरचे तहासिलदार अवळकंठे व स्थानिक कामगार तलाठी जाधव यांनी याबाबत माहिती दिली. शुक्रवारी रात्री साधारणपणे सात ते आठच्या दरम्यान सोसाट्याच्या वारा व मोठ्या प्रमाणात विजाच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. राञी आठ च्या आसपास पोखरी येथील चिमणी बारव जवळ वास्तव्यास आसलेल्या लताबाई भोरु वाघ यांच्या गुरांच्या गोठ्यावर विज कोसळली व त्यात लताबाई यांच्या तीन गायी जागीच दगावल्या अशी माहिती कामगार तलाठी जाधव यांनी दिली.

घटनेची माहिती कळताच पारनेरचे तहसिलदार आवळकंठे यांनी तलाठी व पशुसवर्धन अधिकारी यांना तात्काळ घटनास्थळी भेट देत अधिकार्यानी घटनेचा पंचनामा करून लताबाई वाघ याचे सुमारे दिड लाख रुपयाचे नुकसान झाले अशी माहिती दिली आहे. तसेच गुराच्या छपरवजा आसलेल्या गोठ्याचेही नुकसान झाले असुन वाघ परीवार वीज पडली तेथुन थोडे दुर रहात असल्याने मनुष्य हानी झाली नाही असे सरकारी आधिकार्यानी सांगितले. विजाचे प्रमाण जास्त आसल्याने पोखरीत ही दुर्दैवी घटना घडली. वाघ परिवाराचे गायीच जगण्यचे साधन असल्याने त्यांना मदत मिळावी अशी नागरीकाची मागणी आहे.

Web Title: Three cows killed in lightning strike and rain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here