Prostitution Business: हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय प्रकरणी माजी नगरसेवकाला अटक
Ahmednagar | अहमदनगर: अहमदनगर शहरातील महेश टॉकिज जवळील यशवंत लॉजवर सप्टेंबर, 2021 रोजी दुपारी पोलिसांनी छापा टाकला असता तेथे वेश्याव्यवसाय (Prostitution Business) सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
या प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी नगरसेवक संजय बाबुराव गाडे (वय 57 रा. गोविंदपुरा, यशवंत कॉलनी, अहमदनगर) याला तोफखाना पोलिसांनी आज दुपारी अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर छाप्या दरम्यान पोलिसांनी देहविक्री करणार्या दोन महिलांची सुटका केली होती.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजु सलीकचंद सौदे (वय 59 रा. गोविंदपुरा, यशवंत कॉलनी, अहमदनगर) व संजय बाबुराव गाडे यांच्याविरूध्द स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी या करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी गाडे पसार होता. तो तारकपूर परिसरात येणार असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे तोफखाना पोलिसांनी तारकपूर परिसरात सापळा रचून आरोपी गाडे याला ताब्यात घेत अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Web Title: Former corporator arrested in hotel prostitution Business case