Home अहमदनगर खळबळजनक: मंत्री गडाख यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार  

खळबळजनक: मंत्री गडाख यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार  

Minister Gadakh's personal assistant fire

Ahmednagar Breaking  | नेवासा:- राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर तीन ते चार  अज्ञात गुंडांनी घोडेगाव या ठिकाणी जीव घेणे हल्ला करून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली. तालुक्यातील लोहगाव या गावात ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे.

राजळे हे लोहगाव येथे येताच अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात राजळे यांच्या कमरेखाली एक व डाव्या पायाला एक गोळी लागली तर डाव्या हाताला एक गोळी चाटून गेली आहे.

सदर घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तर पीए राहुल राजळे यांना उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले. हल्ल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Minister Gadakh’s personal assistant fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here