Home क्राईम संगमनेर तालुक्यात एका तरुणीवर तीन वर्ष वारंवार अत्याचार

संगमनेर तालुक्यात एका तरुणीवर तीन वर्ष वारंवार अत्याचार

Sangamner taluka, a young woman was repeatedly sexual abuse for three years

Sangamner | संगमनेर: लग्नाचे आमिष दाखवून उबेद मन्सूर पटेल रा. साकुर ता. संगमनेर याने एका २२ वर्षीय तरुणीवर तीन वर्ष वारंवार अत्याचार (Sexual abuse) केला. तसेच इंटरनेटवर फोटो टाकीन अशी धमकी दिल्याची घटना २०१९ ते २०२२ या कालावधीत घडली. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून येथील शहर पोलीस ठाण्यात पटेल याच्याविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ठाणे जिल्ह्यात राहत असलेली २२ वर्षीय तरुणी संगमनेर तालुक्यातील आपल्या नातेवाईकांकडे आली होती. साकुर येथील उबेद मन्सूर पटेल यांच्याशी तिची ओळख झाली. पटेल याने तिला लग्नाचे आमिष दाखवत २०१९ ते २०२२ या दरम्यान तिच्यावर संगमनेर, पुणे, त्याचबरोबर कारमध्ये अत्याचार केले त्यानंतर आपल्या संबन्धबाबत कोठेही वाच्यता केल्यास फोटो इंटरनेटवर व्हायरल करेल अशी धमकीही पटेल याने पिडीत तरुणीला दिली.  पटेल यापूर्वीदेखील अशाच एका गुन्ह्यात अटक केली आहे.

Web Title: Sangamner taluka, a young woman was repeatedly sexual abuse for three years

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here