Home Accident News Accident:  ट्रक- क्रूझर जीपचा भीषण अपघात; 7 प्रवासी जागीच ठार

Accident:  ट्रक- क्रूझर जीपचा भीषण अपघात; 7 प्रवासी जागीच ठार

Truck-cruiser jeep Accident 7 passengers killed on the spot

बीड | Beed Accident:  भरधाव वेगात असलेल्या ट्रक व क्रूझर जीपची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात (Accident) घडला. या अपघातात 7 प्रवासी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई – लातूर महामार्गावरील सायगावच्या जवळ आज झाला. तर या अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लातूर जिल्ह्यातील आर्वी येथून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी नातेवाईक जीपने जात होते. यावेळी सायगावजवळील खडी केंद्राजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये 5 महिलांसह एक मुलगा व अन्य एक जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Truck-cruiser jeep Accident 7 passengers killed on the spot

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here