Home क्राईम Rape | आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार   

Rape | आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार   

Rape of a minor girl by mother's lover

Nashik | नाशिक: एक घटस्फोटीत महिला पतीपासून विभक्त झाली. तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने पहिल्या पतीपासून झालेल्या तिच्या अल्पवयीन मुलीवर सलग चार महिने शारिरीक अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी बजरंग वाडीतून मुळचा परभणी येथील रहिवासी असलेला संशियीत शिवाजी साळवे वय ३० यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक २८ वर्षीय विवाहित महिला मुळची परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी आहे. तिला पहिल्या पतीपासून ११ वर्षाची मुलगी आहे. पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर महिलेने दुसऱ्या पुरुषासोबत विवाह केला. त्याच्यापासून तिला दोन मुले झाली. दरम्यान दोघांत कलह वाढत असल्याने तिने विभक्त राहत घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. दीड वर्षापासून महिला विभक्त राहत आहे. घटस्फोट प्रकरण न्यायालयात प्रविस्थ असल्याने ती तिसऱ्या पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशिप नाशिक येथे राहू लागले. उदरनिर्वाह साठी तिने धुणीभांडीची कामे सुरु केली. जेव्हा महिला कामावर जात असे तेव्हा तिचा प्रियकर तिच्या ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexually abusing) करत होता. असे फिर्यादीत म्हंटले आहे. पोलिसांनी साळवे यास अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.  

Web Title: Rape of a minor girl by mother’s lover

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here