Home नाशिक कसारा घाटात बर्निंग ट्रकचा थरार !

कसारा घाटात बर्निंग ट्रकचा थरार !

Breaking News | Igatpuri: ट्रकने अचानक पेट घेतल्याने कसारा घाटात बर्निंग ट्रकचा थरार.

thrill of burning trucks in Kasara Ghat

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटातून दि. २ रोजी सकाळच्या सुमारास नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने कसारा घाटात बर्निंग ट्रकचा थरार पहावयास मिळाला. सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र एक्स्प्रेस-वेच्या अग्निशमन दलाने तात्काळ मदतकार्य केल्याने मोठी हानी टळली.

सोमवारी सकाळी सातच्या सुमारास नाशिकहून मुंबईकडे जाणारा ट्रक (क्र. एमएच २७ बीएक्स ७६७४ या ट्रकला नव्या कसारा घाटात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. घटनेची माहिती समजताच मुंबई नाशिक एक्स्प्रेस-वेवरील गस्त पथक अधिकारी रवी देहाडे यांनी आपल्या टीमसोबत घटनास्थळी धाव घेतली. फायरमन राजाराम गायकवाड, समाधान चौधरी, भटाटे यांच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. यावेळी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक साहेबराव पवार, दिंडे, सानप यांनी परिश्रम घेतल्याने घाटातील वाहतूक सुरळीत झाली. काही वेळेसाठी नवीन कसारा घाटातील वाहतूक एकेरी मार्गाने सुरू केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही.

Web Title: thrill of burning trucks in Kasara Ghat

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here