Home अहमदनगर शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा मृत्यू

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: रेल्वे लाईनच्या शेजारी खोदलेल्या अनधिकृत शेततळ्यात पोहोण्यासाठी गेलेला विद्यार्थी श्रीगोंदा याचा शेततळ्यातील चिखलात रुतुन मृत्यू झाला आहे.

schoolboy dies after going swimming in a farm

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी (पुनर्वसन) येथे रेल्वे लाईनच्या शेजारी खोदलेल्या अनधिकृत शेततळ्यात पोहोण्यासाठी गेलेला विद्यार्थी समीर अंकुश बरकडे (वय १३) राहणार निमगाव खलु ता. श्रीगोंदा याचा शेततळ्यातील चिखलात रुतुन मृत्यू झाला आहे.

सदर प्रकरणी परवानगी नसताना बेकायदेशीरपणे खोदलेल्या अनधिकृत शेततळे मालकावर गन्हा दाखल करण्याची मागणी बरकडे कुटुंबाने केली आहे. सविस्तर माहिती अशी सोमवार दि.१ एप्रिल रोजी दुपारी शाळा सुटल्यावर समीर आणि आणि त्याचा मित्र दोघे पोहायला गेले पण हे ठिकाण शेतकऱ्याने अनधिकृतपणे येथील मुरुम रेल्वे लाईनच्याकडेने टाकायला दिला होता त्यामळे येथे शेततळ्यासाठी खड्डा करुन कि त्यामध्ये घोड कॅनॉलचे पाणी सोडून तो भरला होता. खड्ड्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे मोठी दलदल झाली होती. समीरने पाण्यात उडी मारली परंतु उडी मारल्यानंतर तो चिखलात रुतुन बसल्याने तो बाहेर आलाच नाही सोबत नेलेला मुकबधीर असल्याने त्याने शेजारी अनेकांना हातवारे करुण करत समीर बुडल्याचे काय म्हणतोय त्याच्या आईवडिलांना त्याने केलेले हातवारे खुना समजावल्यानंतर सर्वांनी शेततळ्याकडे धाव घेत पाण्यात उड्या मारुन शोध घेतला असता समीर चिखलात रुतलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह बाहेर काढून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुण रात्री उशीरा शोकाकुल वातावरण अंत्यविधी करण्यात आला. आई वडिलांना एकूलता एक मुलगा समीर इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता तो गेल्याचे समजताच एकच हंबरडा फोडला.

Web Title: schoolboy dies after going swimming in a farm

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here